Sinhagad Fort information in Marathi .
Sinhagad Fort information in Marathi : या लेखात आपण सिंहगड पूर्वीचे नाव कोंढाणा किल्याबद्दल जाणून घेऊया . हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येला सुमारे 25 कि.मी आहे . तसेच याची ऊंची समुद्र सपाटीपासून 4400 फुट आहे . सह्याद्रीच्या पूर्व दिशेला पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे . सिंहगड हा स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला आहे .
पूर्वी कोंढणा या नावाने ओळखला जानारा सिंहगड हा पुण्याचा सुप्रसिद्धा किल्ला आहे . हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंजे गावं मध्ये आहे . तसेच पुणे शहरापासून 5 ते 40 की.मी अंतरावर आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार तान्हाजी मालुसरे हे जेव्हा सिंहगड काबिज करण्याच्या मोहिमेवर होते तेव्हा मुघलाशी लढताना त्यांचा मृत्यू झाला . ही बातमी जेव्हा महाराजांच्या कानावर पडली तेव्हा महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला ” त्यानंतर महाराजांनी कोंढणे किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड केले .
किल्ल्याचे नाव | सिंहगड |
ऊंची | समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
ठिकण | पुणे , महाराष्ट्र . |
पर्वत रांगा | भुलेश्वर रांगा |
जवळचे गाव | सिंहगड |
तालुका | हवेली |
Sinhagad Fort History | सिंहगड किल्ल्याचा इतिहास
सिंहगड किल्ल्याच्या निर्मितीविषयी ठोस असे काही पुरावे उपलब्ध नाहीत तरीही महाराष्ट्रातील यादव आणी शिलाहार यांनी हा किल्ला बांधला असेल असे इतिहासकार संगतात . महादेव कोळी या समाजातील नागनाथ या राजाकडे हा किल्ला सुरवातीला होता . नंतर दिल्लीचा सुल्तान मोहोम्मद तुगलक याने दक्खन वर स्वारी केली . त्यात नागनाथ राजा सोबत लढाई केली , पुढे नागनाथ राज्याणी कोंढण्यावर म्हणजेच आजच्या सिंहगडावर आश्रय घेतला . तुगलक याने इथेही गडाला वेढा घातला तब्बल 9 महीने लढून सुद्धा त्याला हा किल्ला ताब्यात घेता आला नाही . शेवटी या पराक्रमाला कंटाळून त्याने दिल्ली जवळ केली .
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या काळात हा किल्ला जिंकून जिंकून घेतला . पण पुढे पुरंदरच्या तहा वेळेस हा किल्ला पुन्हा आदिलशाहकडे गेला . ह्या किल्ल्याच्या देखरेखीची जवाबदारी उदयभान नावच्या सरदारला दिली होती . कोंढाण्या सारख्या किल्ल्याला आदिलशाहीच्या ताब्यात बघून महाराज्यंच्या तळपायाची आग मस्तकात जात असे . तेव्हा महाराजांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना महाराजांनी कोंढाणा जिंकून स्वराज्यात सामील करण्याची जवाबदारी दिली होती . या मोहिमे दरम्यान सरदार तानाजी मालुसरे वीरगतीला प्राप्त झाले . पण जाण्यागोदर त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी जिवाची पर्वा ना करता झुंज देऊन कोंढाणा जिंकून आणला . त्यांच्या जाण्याने महाराज खूप नाराज झाले . त्यांनी याला उदेशून ‘ गड आला पण सिंह गेला ‘ हे उदगार काढले . त्याप्रमाणे या गडाचे नाव कोंढणा किल्ला बदलून सिंहगड करण्यात आले .
Places to see at Sinhagad | सिंहगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे .
सिंहगडावर पाहण्या सारखी बरीच महत्वाची ठिकाणे आहेत जी नक्की पहावी . ती महत्वाची ठिकाणे खलील प्रमाणे .
दारूचे कोठार
किल्ल्यामद्धे प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला दगडी बांधकाम असलेली इमारत नजरेस पडते त्यालाच दारुचे कोठार असे म्हणतात . त्याचा वापर पूर्वी लढाई मध्ये लागणारी सामुग्री साठवून ठेवण्या साठी केला जात असे .
टिळक बंगला
रामलाल नंदलाल यांनी या ठिकाणी जागा घेऊन एका बंगल्याची निर्मिती केली होती . या बंगल्यावर लोकमान्य टिळक बर्याच दा येत असत त्यामुळे या बंगल्याला टिळक बंगला असे नाव पडले असावे . इस . सन 1915 साली महात्मा गांधी यांनी या बंगल्यावर लोकमान्य टिळकांची भेट घेतली होती .
कोढानेश्वर मंदिर
कोढानेश्वर मंदिर महादेवाना समर्पित असून हे यादव कुळाचे कुलदैवत होते . या ठिकाणी आणखी ही महादेवाची पिंड बघायला मिळते .
देवटाके
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उदेशाने किल्ल्यावर देवटाक्याची निर्मिती करण्यात आली होती . पुण्यामधे मुक्कामाला असताना गांधीजी सुद्धा पिण्यासाठी या टक्याचे पाणी मागवत असत असे बोले जाते .
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर
कोढानेश्वर मंदिरपासून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे . भैरव देवता हे कोळ्याचे दैवत आहे . असे म्हणट्ले जाते की पूर्वी गडावर कोळ्यांची वस्ती होती . या मंदिरामध्ये भैरव व भैरवी असया दोन मूर्ति असून त्यातल्या भैरव मूर्तीच्या हातात राक्षसचे मुंडके आहे . आपल्याला आज ही या मंदिरात या मूर्ति पहाइला मिळतात .
कल्याण दरवाजा
गडाच्या पचिमेस हा दरवाजा आहे . पूर्वीच्या काळी इथे हत्ती व माहूत अशी शिल्पे होती .
सुभेदार तनाजी मालुसरे स्मारक
सुभेदार तनाजी मालुसरे यांनी सुमारे 500 मावळ्यांना सोबत घेऊन गनिमी काव्याने कोंढाणा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातून घेऊन स्वराज्यात सामील केला . हे करत असताना त्यांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले . असे सिंहासारखे वैक्तिमत्व असलेल्या तानाजी मालुसरे यांचे स्मारक सुद्धा बघन्या सारखे आहे . दरवर्षी नवमीला या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचा स्मृति दिन साजरा केला जातो .
राजाराम महाराज स्मारक
छत्रपती शिवाजी महाराज याचे सुपुत्र राजाराम महाराज याचे सुद्धा स्मारक सिंहगडावर आहे . मुघल सत्ते सोबत तब्बल 11 वर्ष लढा देत . राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्ष सिंहगडावर देह त्याग केला .
हे सुद्धा नक्की वाचा :