Rice and Weight Loss/Gain
Rice and Weight Loss/Gain जर तुमचे वजन कमी होत नसेल तर बहुतेक जन तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतात . कारण असे मानले जाते की भात खाल्याने वजन वाढते , त्यामुळे बरेच जन भात आवडत असून सुद्धा भात खाणे टाळतात . तांदूळ हे सर्वात जास्त खाल्या जाणारे धान्य आहे . भारतामध्ये विशेषताहा दक्षिण भारतात तांदूळ जास्त खल्ले जातात . प्रमुख आहार म्हणून तांदळाचा वापर होतो .
इडली , डोसा , उतप्पा इत्यादि प्रसिद्धा दक्षिण भारतीय पदार्था मध्ये तांदळाचा वापर होतो . या शिवाय इथले लोक त्यांच्या रोजच्या जेवणात सुद्धा भाताचा वापर करतात . तेव्हा आपल्याला नक्की प्रश्न पडतो की भात खाल्याने वजन वाढते तर मंग इथले लोक लट्ठापणाचे शिकार का नाही होत ? ह्याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात जाणून घेणार आहोत .
सर्वप्रथम हे जाणून घेणे महत्वाचे आहे की भात खाल्याने खरच वजन वाढते का ? टोटल हेल्थ योग सेंटरचे संस्थापक आणि आयुर्वेद तज्ज्ञ महारुद्र शंकर शेटे यांच्या मते, पांढरा तांदूळ हा शुद्ध असतो त्यात उच्च ग्लाईसेमिक इंडेक्स आहे .पण फाईबर सहित अनेक खनिजे हे शुद्धीकरण प्रक्रियेत नष्ट होतात . त्यामुळे जेवा कोणी प्रक्रिया केलेला भात खातो तेव्हा शरीरातील साखर वेगळी होऊन रक्तात विरघळते .हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे .
तज्ञांच्या मते दक्षिणेतील लोक एवडा भात खातात तरीपण त्यांचे वजन वाढत नाही . परंतु इतर राज्यात भाताच्या सेवनाने वजन वाढण्याच्या समस्या उद्भवतात . याचे प्रमुख कारण म्हणजे दक्षिणेत तांदूळ पॉलिश केला जात नाही . बहुतेक राज्यामध्ये दोन ते तीन वेळा पॉलिश केलेला तांदूळ वापरला जातो . जे की अनेक रोगांचे मुख्य कारण आहे .
How to cook rice for Weight loss ? | वजन कमी करण्यासाठी भात कसा बनवावा ?
महाराष्ट्र मध्ये प्रतेक घरात कमी तर कमी एकदा भात शिजतो . विशेसत; पांढरा बासमती तांदूळ हा और्वेदिक आहार पद्धतीतील मुख्य अन्न आहे . कारण तो शिजवण्यास आणि पचवण्यास सुद्धा सोप्पा आहे तसेच चवदार आणि सर्व पाककृती मध्ये सहज वापरता येण्यासारखा आहे . पण आपल्या कडे अनेकांचा असा समाज आहे की भात खाल्याने वजन वाढते त्यामुळे बरेच जन भात आवडत असून सुद्धा खाणे टाळतात . अर्थात भात हा कार्ब्रस चा स्त्रोत असल्या कारणाने असा समाज होणे साहाजिक आहे. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत भात बनवला तर याच्या उलट तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल . आज भात बनवण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत आपण बघू .
- सर्व प्रथम तांदूळ स्वछ धुन घ्या .
- त्यानंतर एक भाग तांदूळ आणि चार भाग पुरेसे पाणी घ्या .
- एक चमचा गायीचे तूप आणि चवीनुसार मीठ घालून भात चांगला शिजेपर्यन्त उकळवा .
- त्यानंतर भातातील पाणी गाळून घ्या हे पाणी तुमी इतर और्वेदिक कामासाठी वापरू शकता .
- आता तुमी दाळ वरण , भाजी सोबत भाताचा आस्वाद घेऊ शकता .
- या भात बनवण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला कधीच वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही .
तांदूळ हे भारतातील सर्वात जास्त सेवन केले जाणारे धान्य आहे . तांदळाशी निगडीत अनेक गैर समाज आहेत .असे मानले जाते की अनेक आजारामधे भात खाल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो . याउलट तज्ञांच्या मते तुमचे वजन कमी होत असेल , तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल किवा पिसीओडी ची समस्या असेल तरी ही तुम्ही भात खाऊ शकता . डॉक्टरांच्या मते तांदूळ हे कार्बोहयड्रेट ने समृद्धा आहे . ते शरीराला ऊर्जा पुरवते आणि अनेक प्रकारे आपण त्याचा जेवणामद्धे समावेश करू शकतो . तसेच तांदूळ हे ग्लुटेन मुक्त सुद्धा आहे . आणि त्यामध्ये लोह , मॅग्नीशियम , पोटॅसीयम आणि बी जीवनसत्वे याप्रमाणे अनेक महत्वाचे पोषक घटक असतात . याशिवाय तांदूळ हा फाईबर च सुद्धा चांगला स्त्रोत आहे . जो पचनक्रिया सुरळीत करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो .
भात खाण्याचे काही फायदे
शरीराला ऊर्जा पुरवणे
भात आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतो . रोजच्या श्रमाच्या कामाला लागणार्या ऊर्जेची पूर्तता भात खाल्याने होऊ शकते .त्यामुळे मी वर सांगितलेल्या पद्धतीने भात बनवून तुम्ही वजन वाढण्याची चिंता सोडून रोज भात खाऊ शकता .
पोषण तत्वाचा स्त्रोत
भाता मध्ये थैमिन, नियासीन, फोलेट, आयरण असे काही महत्वाचे पोषण तत्वे भातात असतात . जे शरीरातील ताकत टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे ठरतात .
ग्लुटेन फ्री
इतर धान्यप्रमाणे भात हा ग्लुटेन फ्री असतो . त्यामुळे ग्लुटेन संभंदित रोग जसे की सिलिएक सारख्या रोगाला भात फायद्याचा ठरतो . शरीर तंदरुस्त राहण्यास फायदा होतो .
पालेभाज्या आणि दाळ यांचा समावेश
भातामध्ये दाळ , पालेभाज्या आणि मास याचा समावेश करून आहार संतुलित करता येतो . त्यामुळे शरीराला पोषक आहार भेटतो .
आपल्याला नेहेमी पडतात असे काही प्रश्न :
मी रोज भात खाऊन वजन कमी करू शकतो का ?
भातामध्ये वजन कमी करण्याचा किवा वजन वाढवण्याचा असा कोणताही गुणधर्म नाही , परंतु तो निरोगी आहाराचा एक भाग असू शकतो
वजन कमी करण्यासाठी कोणता भात उपयोगी पडतो ?
तपकिरी तांदूळ ( Brown Rice ) वजन कमी करण्याची इच्छा असणार्यांसाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतो . हा तांदूळ पचन शक्ति वाढवतो आणि याच्या प्रतेक 100 ग्रॅम मधून 111 कॅलरी मिळते .
वजन कमी करण्यासाठी भातामध्ये काय घालावे ?
प्रतेकी अर्धा कुप भातामागे एक चमचा खोबरे तेल घाला . खोबरेल तेल पाण्यात मिसळून उकलत्या पाण्यात तांदूळ टाकून सुमारे 40 मिनिटे उकळवा . एकदा तांदूळ शिजल्यानंतर सुमारे 12 तास फ्रीज मध्ये ठेवा . फ्रीज मध्ये ठेवल्या कारणाने त्यातील कॅलरीज कमी होतील नंतर तुमी त्याचा आस्वाद घेऊ शकता .