Pratapgad Fort Information in Marathi 2024| प्रतापगडा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Pratapgad , Satara District , Government of Maharashtra, India.

Pratapgad Fort Information in Marathi या लेखात आपण प्रतापगडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्लाची स्थापना केली. हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटी पासून सुमारे 3543 फूट उंचीवर हा किल्ला आहे.प्रताप गड हा सातारा जिल्ल्यातील जावळी तालुक्यातील महाबळेश्वर च्या नैऋत्य दिशेस सुमारे 13 की मी वर आहे. पार आणि किनेश्वर शहरा मधल्या देपर्‍या या डोंगरावर हा किल्ला बांधला गेला आहे . महाबळेश्वर वरुण महाड च्या दिशेने जाताना कुंमरोशी नावाचे ठिकाण लागते त्या ठिकानापासून सुमारे अर्धा तासाचा रास्ता आहे . जावळी जंगल परिसरात हा किल्ला आहे .

मराठ्यांचा थरारक एतीहासीक लढाया, महाराज्यांचे बुद्धीचातुर्य , युद्धकला ,पराक्रम , नियोजन याचा प्रतापगड हा खूप मोठा साक्षीदार तसेच यातला साथीदार म्हणावं लागेल . या किल्ल्याच्या ना प्रमाणेच महाराजांनी तसेच त्यांच्या मावळ्यांनी या किल्ले परिसरात खूप पराक्रम गाजवलेत . आणि विलक्षण इतिहास घडवला . त्याच प्रतापगड किल्ल्या विषयी आपण माझ्या “Pratapgad Fort Information in Marathi ” या लेखात जाणून घेणार आहोत .

Pratapgad Fort Information in marathi |प्रतापगड बद्दल माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या काही किल्ल्यान पैकी एक या किल्ल्याचा समावेश आहे . प्रतापगड हा सह्याद्रि पर्वत रांगेतील, सातारा जिल्ह्यामधील एक डोंगरी किल्ला आहे . चढाई साथी सोपं असलेला हा किल्ला आहे . सुमारे 3543 फूट या किल्ल्याची ऊंची समुद्र सपाटीपासून आहे . जावळी अरण्यातील घनदाट जंगलात हा किल्ला वसलेला असल्या कारणाने हा गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो .

Pratapgad History
किल्ल्याचे नाव / Nameप्रतापगड
प्रकार / Typeगिरीदुर्ग
समुद्र सपाटीपासूनची ऊंची / Hight3543 फूट
संस्थापक / Founderछत्रपती शिवाजी महाराज
कोणी बांधला / Build byमोरोपंत त्रिंबक पिंगळे
ठिकाण / Locationसातारा , महाराष्ट्र .
चढाई / Trekkingसोपी

Pratapgad History | प्रतापगडचा इतिहास

सन 1656 च्या दरम्यान जेव्हा स्वराज्य नावारूपाला येत होते तेव्हा जवळीच्या परिसरचा स्वराज्यात समावेश असावा अशी महाराजांची इच्छा होती . कारण त्यावेळी ज्याचा जावळी वर दबदबा त्याचा बारा मावळावर दबदबा होता . त्यावेळी चंद्रराव मोरे यांच्या कडे जावळीचा परिसर होता . ”चंद्रराव ” ही त्यावेळी अदिलशाह मार्फत दिली जाणारी एक मोठी पदवी होती . चंद्रराव मोरे हे महाराजांच्या कृपेमुळेच जवळीच्या गादीवर बसले होते . पण काही काळा नंतर ते महाराजनाच जुमानत नवते . त्यांचा मनमर्जी कारभार चालला होता शेवटी महाराजांनी जावळी वर हल्ला चडवला . या हल्ल्या दरम्यान चंद्रराव मोरे हा रायगडावर पळला . नंतर महाराजांनी जावळी खोरे ताब्यात घेतले . जावळी खोर्‍यावर राज्य करण्यासाठी तिथे एक ही सुरक्षित कल्ला नवता हे महाराजांनी चटकन हेरले . त्यानंतर जागेचा शोध सुरू असताना महाराजांना एक मोक्याची जागा भेटली तो एक मजबूत विस्तीर्ण , उंच डोंगर होता त्याचे नाव ‘ भोरप्या ‘ डोंगर .

शेवटी भोरप्या डोंगरावर किल्ल्याची जागा नियोजीत करण्यात आली . किल्ल्याचे बांदकाम ‘मोरोजी त्रिंबक पिंगले ‘ यांना सोपवण्यात आले . किल्ल्याचे बंदकाम पूर्णा होण्यास मोठा काळ उलटला . सन 1656 ते 1658 या काळात किल्ल्याचे काम पूर्ण झाले . जावळी खोर्‍याला भक्कम आणि मजबूत असा किल्ला मिळाला . प्रतापगडावर पुढील प्रमाणे यशवंत बुरूज , केदार , रेडका , अफजल , सूर्य बुरूज आणि राज पहारा असे एकूण सहा बुरूज आढळतात . सध्या आपल्याला फक्त या बुरूजाचे अवशेस बघायला मिळतात . या बुरजांची ऊंची प्रतेकी सुमारे 10 ते 15 मीटर होती .

शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगड

शिवाजी महाराज आणि अफजल खानची भेट ही इतिहासातील खूप महत्वाची घटना याच किल्ल्याच्या पायथ्याला घडली होती. अफजल खान हा अदिलशाह च्या आदेशानुसर स्वराज्यावर मोठा फौजफाटा आणि दारूगोळा घेऊन चालून आला. अफजलखान खान हा खूप क्रूर आणि पराक्रमी सरदार म्हणून ओळखला जायचा . या मोहिमेपूर्वी त्याने दक्षिण भारत आणि कर्नाटकात मोठा पराक्रम गाजवला होता . त्याच्या या परक्रमात अनेक राज्ये धुळीस मिळाली.

त्याकाळच्या महाराजांच्या राज्याला काबिज करण्याच्या नापाक इराद्याने तो निघाला होता सोबत अंदाजे 20,000 पेक्षा जास्त घोडदळ, 15,000 पायदळ , 5,000 शिपाई , 80 तोफा , उंट , हत्ती असा भक्कम फौज फाटा घेऊन तो वाई परिसरात पोहोचला . महाराजांना ही बातमी समजताच ते प्रतापगडावर गेले . आपली आई , पत्नी , बाल शंभू राजे यांची काळजी करतबसण्यापेक्षा त्यांनी स्वराज्यच्या खातीर अफजल खानला एकदाचा संपवण्याचा विचार केला होता . महाराजांना किल्ल्या बाहेर आणण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले मंदिरे तोडली , जनतेची लूट केली अक्षरशा रक्ताचा सडा पडला तरी सुद्धा तो महाराजांना किल्ल्या बाहेर आणण्यास असमर्थ राहिला .

शेवटी आपण भयभीत आहोत असे अफजल खानला भासून महाराजांनी खानला भेटीचा निरोप धाडला . प्रतापगच्या पायथ्याला भेट ठरली खान भेटीला तयार झाला . 9 नोवेंबर 1659 रोजी अफजल खान शिवाजी महाराजाणा भेटण्यास तयार झाला .त्या दिवसीची तारीख ठरली . शेवटी भेटीचा दिवस उजाडला .

भेटीच्या अटिनुसार ही भेट सशस्त्र होणार होती भेटी दरम्यान सोबत आपले पाच अंगरक्षक आणि भेटीसाठी उभारलेल्या शामियानात दोन्ही बाजूचा प्रतेकी एक वकील असे भेटीच्या अटीचे स्वरूप होते .

या भेटी दरम्यान अफजल खानने दगाफटका करण्याच्या उदेशाने आलिंगन दिले , आणि दगा करून महाराजांवर कट्यारीने वार केला परंतु महाराजांनी चिळखत घातले असल्याने तो वर फिका गेला आणि अफजल खान गडबडला तीच संधि साधून महाराजांनी वाघनखयाचा वापर करून अफजल खानच्या पोटावर वार करून त्याचा कोथळा बाहेर काढला त्यात तो जागीच मरण पावला . तेव्हा इशारा करताचा दगा धरून बसलेल्या मावळ्यांनी अफजल खानच्या फौजेवर हल्ला चडवला . असया प्रकारे अफजलखानाचा वध हा स्वराज्या साठी मोठा विजय होता . त्या दिवसी महाराजांचा रुद्रअवतार प्रतापगडा ने पहिला .आज ही त्या भेटीची साक्ष देत प्रतारप गड मोठ्या दीमाकात इथे उभा आहे .

शिवकाळा नंतरचा प्रतापगड

संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर जुल्फिकार खान या सरदाराणे राय गडाला वेढा घातला होता . त्यामुळे तेव्हा राजाराम महाराज हे चोर वाटेने रायगडच्या बाहेर पडले आणि त्यांनी प्रतापगडावर आश्रय घेतला. सन 1796 साली जेव्हा दौलतराव शिंदे आणि बालोबा कुंजिर हे नाना फडवणीसानवर चाल करून आले तेव्हा ते काही काळ प्रतापगडावर आश्रयाला होते .

सन 1778 मध्ये सखाराम बापू यांना नाना फडावणीस यांच्या निगराणीत प्रतापगडावर नजर कैदेत ठेवण्यात आले होते . नंतर 1796 साली दौलतरव शिंदे आणि बळोबा कुंजिर हे जेवा फडवणीसावर चल करून गेले तेव्हा फडावणीसाणी प्रताप गडाचा आश्रय घेतला होता अश्या नोंदी आहे . पुढे ब्रिटीशयाच्या काळात , ब्रिटिश आणि मराठ्यान मध्ये झालेल्या यूद्धा नंतर हा किल्ला 1818 मध्ये ब्रिटीशाच्या ताब्यात गेला . 1957 साली प्रतापगडाव छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 मिटर उंच भव्य असा अश्वारूड पुतळा प्रतापगडावर उभारण्यात आला . या पुतळ्याचे अनावरण त्यावेळी तत्कालीन प्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते कण्यात आले होते .

Places to see at pratapgad | प्रताप गडावर पाहण्या सारखी ठिकाणे

प्रतापगडावर पाहण्या सारखी भरपूर ठिकाणे आहेत . यातील जरूर पहावी असी काही ठिकाणे खालील प्रमाणे आहेत .

महादरवाजा

गडाच्या पायथ्यापासून 96 पयर्‍या चढून गेल्या नंतर आपल्याला समोर गोमुखी प्रकारातला भव्य दरवाजा नजरेस पडतो त्याला महादरवाजा म्हणतात .त्याच्या दोन्ही बाजूस भक्कम असे दोन बुरूज दिसून येतात . यातील एका बुरुजावर चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसून येतात याचा अर्थ असा की जो फरांट आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यन्त हा भक्कम किल्ला स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा राहील .

चिलखती बुरूज

महादरवाज्यातून आतमध्ये सरल चालत गेल्यास पुढे एक भगवा ध्वज फडकताना दिसतो . तो ध्वज जिथे आहे त्या ठिकाणाला चिळखती बुरूज म्हणतात . या चिलखत बुरुजवरून खाली जावळी परिसरचे ददृश्य विलोभनीय दिसते . ते बघून जावळी खोर्‍यातील घनदाट जंगलाचे अस्तित्व लक्षात येते .

अफजलखानाची कबर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्‍याची अनुभूति करून देणारी अफजल खानची कबर प्रतापगडा पासून दक्षिण पूर्वेस थोड्याच अंतरावर आहे . चिलखती बुरुजवरून ही कबर आपण पाहू शकतो .हे सुधा किल्ल्यावरील एक मुख्य आकर्षण आहे .

भवानी मंदिर

Bhavani mandir

चिलखती बुरूज बघुण झाल्यावर पूर्वेस गडाच्या वरच्या दिशेला जाताना दोन दरवाजे दिसून येतात या दरवाज्यातून सुद्धा आपण भवानी मंदिराकडे जाऊ शकतो . पण सध्या च्या घडीला तो रास्ता बंद केलेला आहे . या वतीरिक्ता नवीन रस्त्याने आपण भवानी मातेच्या मंदिरात पोहोचू शकतो . या मंदिरातली मूर्ति ही महाराजांनी नेपाळ मधिल गंडकी नदीमधून शालिग्राम शिला इथे आणून एथेच घडवून घेतली आहे .मंदिरातील भवानी मातेची मूर्ति विलक्षण सुंदर आहे .

हंबीरराव मोहिते यांची तलवार

सर सेनापति हंबीरराव मोहिते यांची तलवार आज ही भवानी मातेच्या मंदिरात आपल्याला पहायला मिळते . भवानी मातेच्या मंदिराला लागूनच एक पुरातन शिवलिंग सुद्धा आहे . हा पुरातन ठेवा आपण नक्की पहिल पाहिजे . भवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याकडे चालत असताना उजव्या बाजूला सामर्थ स्थापित बजरंगबलीची मूर्ति आहे .

केदारेश्वर मंदिर

बालेकिल्ल्यातून आत मध्ये चालत गेल्यास पुढे केदारेश्वर महादेव मंदिर नजरेस पडते . अफजल खानच्या भेटी वेळी महाराजांनी याच केदारेश्व मंदिरात दर्शन घेतले होते असे म्हणतात .

राजमाता जिजाऊ यांचा वाडा

केदारेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचे अवशेस दिसून येतात .

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Chatrapati shivaji maharaj statue

बालेकिल्ल्यावर पोहोचताच समोर महाराजांचा ब्रोंज धातू पासून बनवलेला आश्वारूड पुतळा नजरेस येतो . त्याच्या आजूबाजूला छान बागकाम केलेले आहे . पूर्वी या पुतळाच्या जागेवर महाराजांच्या निवासी वाड्याचे अवशेस होते .

तुम्हाला हा प्रतापगडावरील लेख आवडला असेल तर महाराष्ट्रातील किल्ल्याबद्दलचे आणखी लेख bharatinfoadda.com या आपल्या वेबसाइट वर उपलब्ध आहे . नक्की वाचा आणि आपल्या ज्ञानात भर टाका .

नक्की वाचा ;

राजमाची किल्ला
लोहगड किल्ला
तुंग किल्ला