Lohgad Detail Information in Marathi .
Lohgad fort Information in Marathi |या लेखात लोहगड बद्दल संपूर्ण माहिती व त्याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहोत .
लोहगड किल्ल्याची थोडक्यात माहिती .
लोहगड किल्ला हा त्याच्या नावाप्रमाणेच मजबूत असा आहे. लोणावळा नजदिकच्या डोंगर रांगा मध्ये आजही स्वराज्याची साक्ष देत उभा आहे . गिरीदुर्गा प्रकारात मोडणार्या या गडाची ऊंची सुमारे 3400 फुट आहे . हा किल्ला इद्रायणी आणि पवना खोर्यात असल्या कारणाने येथी नैसर्गिक सौंदर्य खूप खुलून दिसते . लोहगड किल्ल्याच्या जवळच विसापुर हा किल्ला आहे ज्याची निर्मितीच मुळात लोहगडच्या संरक्षंनासाठी झाली आहे .भारत सरकारने दिनांक 26 मे, इ. स. 1909 रोजी या किल्ल्याला महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे . लोहगडावरून पवना धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पालीकडेच ‘तिकोणा’ नावाचा अजून एक किल्ला आहे . ज्याचा आकार त्रिकोणा सारखा असल्या कारणाने त्याच नाव तिकोणा असे पडले असावे .
किल्ल्याचे नाव / Name | लोहगड |
ऊंची / Hight | सुमारे ३४०० फूट |
किल्ल्याचा प्रकार / Type | गिरीदुर्ग |
चढाई श्रेणी / Trek | सोपी |
ठिकाण / Location | लोणावळा , पुणे जिल्हा ,महाराष्ट्र . |
लोहगड किल्ल्याचा इतिहास .
लोहगड हा किल्ला अतिशय प्राचीन असून सुमारे ७०० ते ८०० वर्षा पूर्वी याची निर्मिती झाली असावी . या किल्ल्यावर अनेक सत्तानी राज्य केले जसे की सातवाहन , चालुक्य , राष्ट्रकूट , यादव , बहमणी , निजाम , मुघल आणि मराठा . अश्या विविध सत्ता या किल्ल्याने अनुभवल्या .
सुमारे सन १४८९ मध्ये मलिक अंबर याने निजाम शाही ची स्थापना केली आणि झपाट्याने राज्याचा विस्तार करण्यास सुरवात केली . त्यानंतर १४९१ मध्ये त्याने हा किल्ला निजाम शाहीच्या ताब्यात घेतला . त्यानंतर १६३६ पर्यन्त लोहगड आणि मावळ चा संपूर्ण प्रदेश हा अहमदनगर च्या निजामकडे होता .पुढे जेवा निजामशाही चा शेवट झाला तेवा हा प्रदेश आदिलशाही च्या ताब्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६४८ मध्ये आपल्या ताब्यात घेतला . त्यानंतर खर्या अर्थाने स्वकीयाची सत्ता या किल्ल्यावर नादू लागली . नंतर १६५६ सालात महाराजांनी एका पाठोपाठ बर्याच किल्ल्याचे नाव बदलली त्यामध्ये विसपुर चे संबळ गड , तोरण्याचे प्रचंड गड , तिकोण्याचे वितुंग गड , तुंग चे कठीण गड , पण महाराजांनी लोहगड चे नाव बदलले नाही कारण लोहा सारख्या मजबूत या किल्ल्याला लोहगड हे खूप साजेसे होते . त्यामुळे आजही लोहगड किल्ल्याचे नाव तेच आहे .पुढे १६६१ मध्ये महाराजांनी कारतलब खानचा उंबर खिंडीत मोठा पराभव केला .अवघ्या २ ते ३ हजार मावळ्यांनी सुमारे २० हजार शत्रू चा गनिमीकावा वापरुन पराभव केला . हा महत्वाचा विजय लोहगड परिसरात झाला .
सन १६६४ साली महाराजांनी पहिल्यांदा सूरत लुटली . त्या लुटी मध्ये भेटलेली अडमाप संपत्ति त्यावेळी नेताजी पालकर यांच्या देखरेखी मध्ये लोहगड येथे ठेवण्यात आली होती . ही संपत्ति लोहगडावर दगडी कोठारामधे ठेवण्यात आली असावी त्यामुळेच या दगडी कोठाराणा आज पण लक्ष्मी कोठार असे म्हणतात .
सन १६६५ च्या झालेल्या पुरंदर च्या तहा मध्ये महाराजन ४० पैकी २३ किल्ले मिर्झा राजे जयसिंग याला द्यावे लागले . त्या २३ किल्ल्या मध्ये लोहगड चा सुद्धा समावेश होतो . पुरंदर तहा दरम्यान किल्ला मुघलान कडे गेला खरा पण पुढच्या ५ वर्षा मध्ये महाराजांनी लोहगड पुन्हा स्वराजयमद्धे सामावून घेतला . पुढे संभाजी महाराजच्या कारकीदीत हा किल्ला मराठ्यांकडेच राहिला .
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे पर्यन्त पुन्हा मुघल हा किल्ला ताब्यात घेऊ शकले नाही . पण संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला . पुढे १६९९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही यशस्वी झाला नाही .पुढे पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर जास्त करून कैद खाना म्हणून करण्यात आला . त्यावेळी तुळाजी आगरे आणि त्यांचे साथीदार एथेच कैद असल्याचे सांगण्यात येते .
What to see at Lohgad Fort | लोहगडावर नेमके काय पहावे ?
लोहगडावर जाताना आपल्याला चार प्रवेश द्वारातून जावे लागते . किल्ल्यावर एकूण चार दरवाजे आहेत . मुख्य दरवाजा त्यावरील रेखीव काम , विंचू कडा , लक्ष्मी कोठी , पिण्याच्या पाण्याचा कुंड , मजबूत तटबंदया असया अनेक ठिकाणी आपण आपला वेळ घालवू शकतो .
गणेश दरवाजा
असे म्हंटले जाते की गणेश दरवाज्याच्या उजव्या व डाव्या बुरूजा खाली साळवे कुटुंबाचा बळी देण्यात आला होता त्यामुळे त्यांच्या वरसाना या किल्ल्याची पाटिलकी देण्यात आली होती . आतील बाजूस त्या संबंधी शिला लेख उपलब्धा आहे आणि काही तोफा सुद्धा आपल्याला अत मध्ये दिसून येतात . या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस असणार्या बुरूजची चाल करून येणार्या शत्रूला थांबवण्यासाठी खूप महत्वाची मदत होत असे .
महादरवाजा
महादरवाजा हा किल्ल्याचा एक महत्वाचा दरवाजा आहे . या दरवाज्यावर असलेले सुंदर असे नक्षीकाम पर्यटकान चे मन मोहून घेते. या दरवाज्याकडे जाताना सुंदर असया पायर्या आणि तटबंदी बघायला भेटते . किल्ल्यावरील सर्वात आकर्षक दरवाजा हाच आहे .
नारायण दरवाजा
असे म्हंटले जाते की नारायण दरवाजा हा नाना फडावणीस यांनी बांधला आहे . एथून मधेच एक तळघरसारखे भुयार आहे ज्याचा वापर त्या वेळेस धान्य साठवण्यासाठी करण्यत येत असेल . पण आता त्या भुयाराची अवस्था थोडी बिकट आहे .
हनुमान दरवाजा
हा किल्ल्यावरील सर्वात जुना दरवाजा आहे . गौमुखी आकाराचा असणारा हा दरवाजा खूप मजबूत असा बांधलेला आहे . या दरवाज्याला बघून त्याकाळी गडाची मजबूती कासि असेल याचा पुरेपूर अंदाज येतो . या दरवाज्याचे काम १ नोवेंबर १७९० ते ११ जून १७९४ या काळात नाना फडावणीस याच्या मार्फत करण्यात आले होते . दरवाज्यातून आत जाताना एक दर्गा नजरेस पडतो . त्याला लागूनच त्या काळातील लोहारच्या दुकांनाची अवशेस दिसून येतात . या वरुण समजते की त्या काळात सुद्धा केलल्यावर सर्व सोयीची पूर्तता करण्या आली होती .
लक्ष्मी कोठी
असे म्हंटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलेला सुरतेचा खजाना याच लुक्ष्मी कोठीमद्धे ठेवण्यात आला होता . या कोठी मध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत . त्यामुळे आपण म्हणू शकतो की या कोठी मध्ये राहण्याची सोय सुधा होती . ही कोठी पूर्ण दगडामद्धे कोरलेली आहे .आता कोठीच्या दरवाज्याची पडझड झाली आहे . पण कोठी पाहुन ती अगोदर च्या काळात कसी मजबूत आणि प्रशस्त असेल याचा अंदाज नक्की येतो .
शिवकालीन सभागृहा आणि शिवमंदिर .
किल्ल्यावर पोहोचल्यानंतर थोडा उंचवट्याचा भाग आहे जिथे शिवकालीन सभागृहा आहे आणि त्याच्याच बाजूला एक शिवमंदिर सुद्धा आहे . सभागृहाची पडझड झाली असल्या कारणाने आता तिथे आपल्याला एक प्रशस्त दगडी ओटा बघाईला मिळतो . ज्यावर एक तोफ सुद्धा आहे . त्याच्याच बाजूला असलेले पुरातन शिव मंदिर सुद्धा सुंदर आहे . तिथे दर्शन घेतल्यावर तुमचा किल्ला चढताना आलेला थकवा नक्की दूर होईल आणि प्रसन्ंन वाटेल .
पिण्याच्या पाण्याचा हौद .
मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुढे पिन्याच्या पाण्याचा पुरातन हौद आहे . ते पाणी आपण बोट्टल मध्ये भरून पीऊ शकतो . हे पाणी एकदम स्वछ व थंडगार असते .
अष्टकोणी विहीर
शिवमंदिरापासून उजव्या बाजूस चालत गेल्यास पुढे अष्टकोणी विहीर नजरेत पडते . त्या विहिरीला ८ कोपरे आहेत त्यामुळे तिचे नाव अष्टकोणी पडले असावे . विहीरीमधे उतरण्यासाठी पायर्या सुद्धा आहेत पण त्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या पायर्या ची आता पडझड झाली आहे . त्यामुळे आता त्या तेवड्या मजबूत राहिल्या नसाव्या . त्यात पाहिल्यावर वेग वेगळ्या प्रकारचे मासे पण दिसतात .
सोळाकोणी तलाव
जसे अष्टकोणी विहिरीला ८ कोपरे आहेत तसेच या तलावाला १६ कोपरे आहेत त्यामुळे याला सोलकोणी तलाव म्हणतात . त्यामध्ये उतरण्यासाठी दोन बाजूने पायर्या आहेत आणि पूर्ण तलाव दगडांनी बांधलेला आहे . विशेस म्हणजे तीन ही ऋतु मध्ये तलावात पाणी पहायला मिळते . हा तलाव नाना फडावणीस यांनी बांधलेला आहे असि माहिती मिळते .
विंचू कडा
गडाच्या पच्चिमेला जो निमुळता भाग दिसतो त्यालाच विंचू कडा असे नाव आहे. ही डोंगराची माची १५०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे. गडावरुन पाहिल्यावर हा भाग विंचाच्या नांगी सारखा दिसतो त्यामुळे याला विंचू कडा असे नाव पडले आहे . विंचू कड्याचा वापर आजूबाजूच्या परिसरावर लक्षं ठेवण्यासाठी केला जात असेल . आताच्या घडीला विंचू कड्यावर आपल्याला पवना डॅम चा विस्तृत परिसर बघाईला मिळतो . विलक्षण नजारा आहे . एकदा तरी नक्की बघावा असा .
Best time to visit the fort |गडावर जाण्याचा उत्तम काळ.
या किल्ल्यावर तीन ही ऋतु मध्ये भेट देउ शकता . पावसाळ्यामद्धे इथली द्रुष्य फार मनमोहक असतात , परंतु पावसामुळे किल्ल्याकडे येणार्या रस्त्याने वाहने सावकाश चालवा . पावसाळ्यामद्धे किल्ल्याच्या पायर्या वर चालताना घसरण्याचा धोका वाढतो त्यामुळे पावसाळ्यात वयस्कर वृद्धाणी किल्ल्यावर येणे टाळावे .
Time to visit the fort | गडावर भेट देण्याची वेळ .
गडावर आपल्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यन्त भेट देता येते . जर तुमी उन्हाळ्यात भेट देत असाल तर सकाळी लवकर जा नाहीतर तुमला चढाई करताना प्रखर उन्हाचा त्रास सहन करावा लागेल .
How to Reach Lohgad Fort | लोहगड किल्ल्याला कसे पोहचावे.
पुण्यापासून हा किल्ला सुमारे 50 की मी आहे . इथे पोहोचण्यासाठी बस ची सुविधा नाही पण खाजगी वाहनाने आपण इथे पोहोचू शकतो . त्यामुळे खाजगी वाहनाने इथे पोहोचणे फायद्याचे आहे . मुंबई वरुण जार इथे पोहोचाईचे असेल तर , अगोदर लोणावळा इथे येऊन आपण खाजबी वाहनाने लोहगड किल्ल्यावर पोहोचू शकतो .
मित्रांनो माहिती वाचून आपल्याला समजलेच असेल लोहगड किल्ला कसा आहे . जर तुमी अगोदर लोहगड किल्ला पहिला आहे. तर आपले अनुभव आमच्या सोबत जरूर शेअर करा .
लोहगड प्रमाणेच राजमाची किल्ला आपल्याला जाणून घायच असेल तर इथे क्लिक करा .