Tung Fort |तुंग किल्याबद्दल जाणून घेऊया .

Tung Fort Information in Marathi

Tung Fort Information in Marathi

Tung Fort Information in Marathi | या लेखात आपण तुंग किलल्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत . पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 जून 1065 रोजी मिर्झा राजे जयसिंग ला दिलेल्या 23 किल्ल्या पैकी तुंग हा एक किल्ला होता .

महाराष्ट्रातील साह्याद्रि डोंगर रांगात खास करून पवन मावळ भागात निसर्गाची जरा जास्तच कृपा झालेली दिसते . धबधबे , छातीत धडकी भरणारे उंच डोंगर , वेगाने वाहणारे वारे , वन्यजीव या सर्व मुळे पर्यटकची पावले आपोआप इकडे वळतात . मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्वाचे किल्ले हे मावळ प्रांतात आहेत . पवन मावळात विसपुर , लोहगड ,तुंग आणि तिकोना हे महत्वाचे किल्ले आहेत . त्यापैकि तुंग या किल्ल्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत . पूर्वी बोरघाट या व्यापारी मार्गावर तसेच मावळ प्रांतातील हालचाली वर लक्षं ठेवण्यासाठी तुंग या किल्ल्याचा वापर केला जात असे .

किल्ल्याचे नाव तुंग किल्ला
किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्गा
ठिकाण तुंगवाडी , पुणे जिल्हा , महाराष्ट्र .
चढाई सोपी
समुद्र सापतीपासून ऊंची 3527 फूट

Tung Fort history |तुंग किल्ल्याचा इतिहास

तुंग किल्ला हा मावळ प्रांतातील एक घाट रक्षक किल्ला म्हणून ओळखला जातो . पूर्वी महत्वाच्या व्यापारी मार्ग म्हणजे बोरघाटावर देखरेखी साथी मुख्य करून या किल्याचा वापर होत असे . या किल्ल्यावरून आपल्याला लोहगड ,विसपुर , तिकोना आणि पवन मावळचा भाग नजरेस पडतो . हे दृश्य बघायल विलक्षण सुंदर आहे .

सन 1657 मध्ये इतर किल्ल्या प्रमाणे हा किल्ला सुधा स्वराज्यामद्धे सामील झाला होता . त्यानंतर सन 1660 मध्ये या भागाच्या देखरेखी साथी नेताजी पालकर यांची निउक्ती झाली होती .6 मे 1665 रोजी जेव्हा जयसिंग आणि दिलेर खानने जेव्हा मावळ प्रांतावर स्वारी केली तेव्हा तुंग आणि तिकोना किल्ल्याच्या आसपासच्या गावांना त्यांनी जाळले पण तुंग आणि तिकोना किल्ल्याला ते जिंकू शकले नाही . शेवटी पुरंदरच्या तहाच्या वेळी 18 जून ला कुबत खानाणे हलाल खान आणि इतर साथीदारा सोबत हा परिसर ताब्यात घेतला . निजाम शहाणे तुंग भागातून भरपूर संपती मिळवली असल्याचे इतिहासातिल ऊल्लेखातून समजते . निजामशाही च्या अगोदर पासून तुंग किल्ला लष्करी कामासाठी उपोगात आणला जायचा. 1636 पर्यन्त किल्ला निजाम शाहीच्या ताब्यात होता त्यानंतर 1636 ते 1657 मध्ये हा किल्ला आदिल शाहीच्या ताब्यात होता . या किल्ल्याचे उतुंग सुळके आणि काठिन्य पातळी या सर्व गोष्टी मुळे शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला कठीण गड असे नाव दिले .

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाणा नंतर बहुतेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले असले तरी तुंग हा किला मात्र सन 1704 पर्यन्त मराठ्यांच्या ताब्यातच होता . इसवी सन 1704 मध्ये चाकण चा मुघल फौजदार आमणतुल्ला खान याने तुंग हा किल्ला मुघलच्या ताब्यात घेतला . पुढे औरंजेबाच्या मृतू नंतर मराठ्यांनी सर्व किल्ले परत जिंकण्यास सुरवात केली तेव्हा हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला .इसवी सन 1818 पर्यन्त हा किल्ला किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण त्यानंतर हा किल्ला ब्रिटीश सत्तेच्या अधिपतेखाली गेला . या किल्ल्याला तसी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही .

What will you see at Fort | किल्ल्यावर काय पहाल

गड माथ्याचा भाग जास्त मोठा नसल्याने गड लवकर पाहून होतो . तुंग वाडीतून गडावर जाण्याची वाट मारोतीच्या मंदिरापासून जाते . बाकी किल्ल्यावर नक्की बघावे असे महत्वाचे ठिकाण खलील प्रमाने .

वीरगळा

virgala

त्याकाळी वीरमरण पावलेल्या सैनिकांच्या स्मरनार्थ त्यांच्या पराक्रमाचा दाखला देणार्‍या दगडी मुरत्या कोरल्या जात होत्या त्यालाच वीरगळा असे म्हणत असे . तुंग किल्ल्याच्या पायथ्याला आजही या वीरगळा दिसून येतात आपण तिथे पाहू शकतो . आजही इथे काही हात असलेल्या सिळा बघाईला मिळतात . लढाईत वीर मरण पावलेल्या सैनिकांच्या पत्नी जेवा सती जात असत तेवा त्यांच्या स्मरनार्थ या शिला बनवल्या जात होत्या त्याला आज सतीसिळा असे म्हणून ओळखतात.

चपेटदार मारोती

पायर्‍यांनी गडावर चढत असताना एका देवडीमडे आपल्याला मारोतीची मूर्ति दिसते तिलाच चपेटदार मारोती असे म्हणतात . नीट बगितल्यास या हनुमानच्या पायाखाली पानोती राक्षसीन दाबलेली दिसून येते आणि चपेट मारण्याचा पावित्रा असल्या कारणाने या मरोतीला चापेट मारोती म्हणतात .

गणेश दरवाजा

Ganesh Darvaja

किल्ल्याचे प्रथम प्रवेश द्वार म्हणजेच गणेश दरवाजा आहे . पण आता दरवाज्याची बरीच पडझड झालेली दिसून येते . सध्या या दरवाज्याला सवर्धांची गरज आहे . नाहीतर येणार्‍या पाऊस वार्‍या मुळे त्याची आणखी पडझड होऊ शकते .

हनुमान दरवाजा

Hanuman Darvaja

गणेश दरवाज्यातून मध्ये काही अंतर पार केल्यानंतर आणखी एक दरवाजा लागतो त्यालाच हनुमान दरवाजा असे म्हणतात . असयातच या दरवाज्याचे सवर्धन झाले आहे . हा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे . हा दरवाजा नावा प्रमाणेच मजबूत आहे . दरवाज्याच्या बाजूला हनुमानाची मूर्ति कोरलेली आहे .

गणेश मदिर

Ganesh Mandir

हनुमान दरवाजा पार केल्यानंतर पुढे आपल्याला एक पुरातन हनुमान मंदिर दिसते. तेथील स्थानिक रहिवास्यांची या मंदिराबद्दल श्रधा आहे .

तलाव

Talav

गणेश मंदिराच्या बाजूलाच एक पुरातन तलाव आहे . ज्यामधे उतरण्यासाठी पायर्‍या सुद्धा आहेत . आज ही या पायर्‍या साबूत आहेत . त्यातील नितळ पाणी पाहून मन प्रसन्न होते . या तलावात रंगीबेरणी वेगवेगळ्या जातीचे मासे सुद्धा दिसतात .

तुंग देवीचे मंदिर

गडाच्या टोकावर एक छोटे तुंग देवीचे मंदिर आहे . गडाला प्रदक्षिणा घालताना सावध असणे गरजेचे आहे कारण मंदिराच्या बाजूला कमी जागा आहे . आणि मंदिरासमोर आतमध्ये एक गुहा आहे ज्याला पाण्याचे टाके सुद्धा म्हणतात . जिथे पावसाळ सोडून इतर ऋतू मध्ये तीन ते चार जन मुक्काम करू शकता .

How to reach tung fort | तुंग किल्ल्याला जाण्याचा मार्ग

Tung Fort हा किल्ला पुण्यापासून सुमारे 60 की मी आहे आणि मुंबई पासून 130 की मी . या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्यावर असणार्‍या तुंगवाडी गावातून जातात .

सर्व प्रथम लोणावळा पोहोचून तिथून खाजगी वाहनाने आपण तुंगवडी मध्ये पोहोचू शकतो .

किवा लोणावळा स्टेशन पोहोच्ल्यवर तेथून भामबुरडे किवा अंबवणे मार्गे जाणारी एस टी पकडून सुमारे 25की मी वरील घुसलगाव फाट्यावर उतरावे . या फात्यावरून दीड तासाची पायपिट करून आपण तुंगवाडीत पोहोचतो .

अनेकजण तिकोना ते तुंग असा प्रवास सुद्धा करतात . त्यासाठी तिकोना किल्ला पाहून झाल्यावर तिकोना पेठेत उतरावे नंतर काळे कॉलनी चा रास्ता पकडून तुमी ब्रम्हली गावात पोहोचतात .ब्रम्हली गावातून बोट पकडून तुमी पवना धरणाच्या पाण्यातून जलविहरचा आनंद लुटत तुमी पलीकडच्या तिरावरील केवरे गावात पोहोचता . केवरे गावातून 20 मिनिटची पायपिट करून तुमी तुंगवाडी मध्ये पोहोचता . तुंग किल्ल्यावर पोहोचण्यासाठी कमी तर कमी 30 मीन ते 1 तास लागतो .

Accommodation at the Tung Fort |गडावरील राहण्याची सोय ?

तुंगवाडी च्या मारोती मंदिरात सात ते आठ जनाची राहण्याची सोय आरामात होते . किवा तुंगवाडीत भैरोबाचे मंदिर आहे त्यात पण 3 ते 4 जन आरामात झोपू शकता .तसेच तुंगवाडी गावात जेवणाची सोय आहे मात्र गडावर कोणत्याही प्रकारची जेवणाची सोय नाही तसेच कोणतेही दुकान नाही .

माझा लेख तुमला कसं वाटला हे कॉमेंट मार्फत नक्की कळवा आणि या लेखा प्रमाणे असेच आणखी वेगवेगळ्या किलल्याबद्दलची रोचक माहिती वाचण्यासाठी खाली चेक करा .

नक्की वाचा :

लोहगड किल्ला
राजमाची किल्ला