Rajmachi Fort Information in Marathi |राजमाची किल्ल्याची संपूर्ण माहिती.

Rajmachi Fort detail information in Marathi :

Rajmachi Fort in marathi राजमाची किल्ल्याची संपूर्ण माहिती . ( Rajmachi fort Height , Trek from pune , Distance from Lonavla station , distance from pune & Mumbai , Srivardhan Fort & Manoranjan Fort ) ही सर्व माहिती तुमाला या लेखात मिळेल .

Rajmachi Fort

History of Rajmachi Fort in Marathi ( राजमाची किल्ल्याचा इतिहास )

राजमाची किल्ल्याच्या पश्चिमेस उतारावर एक पुरातन लेणी आहे . या लेणीलाच ‘कोंढणे लेणी ‘ असे म्हणतात . ही लेणी रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोंढणे या गावपासुन अग्रेय दिशेस 2 कि मी अंतरावर आहे . ही लेणी सातवाहन काळाच्या सुरवातीला खोदलेली आहे . यामध्ये सात विहार आणि एक चैत्यगृहाचा समावेश आहे . हा किल्ला साधारण 2500 वर्षा पूर्वीचा असावा असे मानले जाते . राजमाची किल्ल्याला पूर्वी ‘ कोकणचा दरवाजा ‘ म्हणून सुद्धा संबोघले जायचे . कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व कल्याण विभागात असलेल्या बोरघाट वरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसपुर हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले . पुढे संभाजी महाराज जीवंत असे पर्यन्त म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते . यानंतर १७१३ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ‘काणोजी आग्रे’ यांना दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले ‘बाजीराव पेशवे ‘ यांच्या ताब्यात आला . त्यानंतर १८१८ मध्ये हा किल्ला इग्रजांनकडे गेला .

किल्ल्यावर ‘ मनरंजन आणि श्रीवर्धन ‘ या नावाचे दोन बालेकिल्ले आहेत , मनोरंजन च्या पायथ्यासी उधेवडी नावाची छोटीसी वाडी आहे . तिथून पुढे दक्षिणेला संरक्षित वन आहे . कोंदिवडे आणि कोंढाणा जवळ उल्ल्हास नदीचा पात्रात एका मोठ्या दगडामद्धे २१ हांडे मावेल एवडा पाळणा कोरलेला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ति कोरलेली आहे पूर्वी स्थानिक लोक मुलबल होण्या साठी या ठिकाणी नवस करत असत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटियर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्टा क्र ७२१ वर दिला आहे . या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ‘ म्हणतात . येथे येणारे पर्यटक मोठ्या श्रद्धेने येथे स्ंनान करतात .

किल्ल्याचे नाव राजमाची
प्रकार गिरीदुर्गा
ऊंची ८३३ मिटर
चढाई ची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्ला , महाराष्ट्र , भारत .
जवळचे गाव लोणावळा , खंडाळा ।
डोंगर रांगा सह्याद्रि
सध्याची अवस्था चांगली
स्थापना सुमारे सातवाहन च्या काळात .

Giographical Importans of Rajmachi Fort ( राजमाची किल्ल्याचे भौगोलिक द्रुष्ट्या महत्व) .

त्या वेळी कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती या बंदरापसून पासून बोरघाट मार्गे पुण्याला जाण्याचा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग होता . जसा नाणे घाट तसाच बोरघाट होता . त्यामुळे या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी केला जात असे . या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व जकात वसूली साठि कोकण आणी घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा वापर केला जात असे .त्यामुळे राजमाची किल्ल्याचे महत्व खूप वेगळे होते .

राजमाची किल्ल्याचे भौगोलिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे या किल्ल्या वरुण आपल्याला एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग , तिकोना तर दुसर्‍या बाजूस पेठ , भीमाशंकर , ढाकचा किला , गोरख गड , सिद्धगड , चंदेरी असा परिसर नजरेत पडतो .

Best place to visit on Rajmachi Fort ( राजमाची किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे )

किल्ल्यावरील उदयसागर तलाव जरूर पहा जो १७१२ मध्ये बांधला गेला आहे . याच तलावाच्या बाजूला असलेल महादेवची मंदिर . श्रीवर्धन व मनरंजन जवळील पाठरावरील बहीरोबाचे मंदिर बघायला मिळते .

मनरंजन : उंचीणे श्रीवर्धन पेक्षा लहान असणार्‍या या बालेकिल्यावर जाण्याची वाट सोपी आहे . साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेश द्वारा जवळ पोहोचतो . या किल्ल्याला दोन दरवाजे असून तेथील तटबंदी मुळे जवळ जायी पर्यन्त ते दिसून येत नाहीत . मनरंजन च्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तु , एक तलाव , आणि काही ईमारतीचे अवशेस आहेत . किल्ल्याची तटबंदी आज ही काही प्रमाणात शाबूत आहे व त्यावर दोन बुरूज आहेत . येथून कर्णाळा, प्रबळ गड , ईरशाळ गड ,ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो .

श्रीवर्धन : राजमाचीच्या असणार्‍या दोन बालेकिल्ल्या पैकी श्रीवर्धन हा उंच आहे . श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरूज आज ही चांगल्या स्थिति मध्ये आहे . दरवाजा सुद्धा चांगल्या स्थिति मध्ये आहे . दरवाज्याच्या बाजूला पहारेकर्‍या करिता बनवलेल्या देवड्या आहेत . किल्ल्याची माथ्यावर जाण्याची वाटेवर एक गुहा आणि पाण्याच्या दोन टाक्या आहेत . गडाच्या उतरेस आणि दक्षिणेस दुहेरी तटबंदीचा बुरूज आहे . गडाच्या माथ्यावरून लोहगड , तुंग , मोरगिरी, कोरिगड , बहिरान पठार , घनगड, खंडाळा , सोंगिरी, माथेरान , ढाक हा परिसर दिसतो .

पावसाळ्यामद्धे कातलधारा धबधबा सुद्धा विलोभनीय दिसतो . राजमाची हे महाराष्ट्रातील आवडते ट्रेकिंग डेस्ट्टीनेशन आहे .

Godhneshvar Tempal ( गोधनेश्वर मंदिर )

Godhaneshwar temple .

राजमाची किल्ल्याची पायथ्याला उधेवाडी गावातून एक दगडी पायवाट आपल्याला एक प्राचीन हेमाडपंथी मंदिराकडे आणि तलावाकडे घेउन जाते .

त्या तलावाच्या काठी एक सुंदर असे शिव मंदिर आहे . प्राचीन काळातिल सुमारे ७०० ते ८०० वर्ष जुने असावे . गोधनेश्वर मंदिर नेमक हे मंदिर कधी आणि कोणी बांधले या बद्दल जास्त माहिती उपलब्धा नाही , परंतु एथील गावकर्‍यांनी हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजच्या आधी पासून म्हणजेच ई .स १६३० च्या आधीचे आहे असे संगितले .मंदिर अतिशय सुंदर आहे , मंदिराचा सभामंडप रेखीव दगडी खांबावर उभा आहे . मंदिराच्या गाभार्‍या समोर दगडी नंदी बसवला आहे .

How to reach Rajmachi Fort ( राजमाची किल्ल्यावर कसे पोहोचवे )

रेल्वे लोकल ने प्रवास करणार्‍या पर्यटकांना स्टेशन पासून गडावर जाण्यासाठि खाजगी वाहन उपलब्द आहे. किवा तुम्हाला पुण्यावरून याईच असल्यास तेथून टॅक्सी करून सुद्धा तुमी डायरेक्ट किल्ल्या फरांट येऔ शकता . राजमाची किल्ल्याला मुंबई किवा पुण्यावरून बाय रोड सहज जाता येते .

How to treak on Rajmachi ( राजमाची ट्रेकिंग )

राजमाची किल्ल्यावार जाण्यासाठि दोन मार्ग आहेत . लोणावल्यापासून आणि रायगड जिल्ल्यातील कर्जत तालुक्यातील कोंडीवडे किवा कोंढणे गावातून . लोणावळा राजमाची हे अंतर १५ किमी आहे . या वाटेत चड उतार खूप असले तरी हा रास्ता साधा पाइवाट आहे . सुमारे साढे तीन तास पाइ अंतर पूर्ण करण्यासाठी लागतात . कोंडीवडे किवा कोंढणे गावातून राजमाची किल्ल्याचा रास्ता हा सर्व चढाइचा आहे . अनुभवी ट्रेकर ल हा त्ट्रेक पूर्ण करायला सुमारे दोन तास लागतात . जर ट्रेकर्स ग्रुप ल ट्रेक च्या मार्गाची माहिती नसेल तर त्यांनी स्थानिक मार्गदर्शक सोबत घ्यावा ही विनंती .नोहेंबर ते मे या कलावधीत टाटा सुमो , बुलेरो या सारख्या मजबूत गाड्यांनी आपण बुधेवाडी या गावापर्यन्त जाऊ शकतो . अश्या भक्कम राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठि टाटा सुमो सारखी मजबूत वाहने आपण लोणावळा किवा खंडाळा येथून भाड्याने घेऊ शकतो . ते पण एकदम माफक दरामध्ये . राजमाची हा सोपं ट्रेक आहे इथे वाहने तुमला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात सोडतात . राजमाचीचा सर्वात चांगला आणि मस्त भाग हा दुचाकी स्वरसाठी आहे . वाटेत मस्त धबधब्याचे दृश्य बघायला भेटतात .

Best time to visit Rajmachi fort ( राजमाची किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ )

सप्टेंबर ते मार्च या महिन्यात किल्ल्यावरील वातावरण खूप मनमोहक असते .तर मित्रांनो या लेखात आपण जी माहिती पहिली ती जर तुमला आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा . तर मंग कधी करताय राजमाची फिरण्याचा प्लॅन .

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा .